Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळीतील पाचजण जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील पाच जणांना कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. समीर खाजा शेख (रा. झारेकरगल्ली अहमदनगर), विशाल राजेंद्र भंडारी (रा. चिपाडेमळा सारसनगर अहमदनगर), परवेज महमूद सय्यद (रा. भोसलेआखाडा अहमदनगर), प्रतीक अर्जुन गर्जे (रा. सारसनगर अहमदनगर), अमोल संजय चांदणे (रा. चिपाडेमळा अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की दि.6 जानेवारीला रात्री गस्ती दरम्यान कोतवालीचे पो.नि. राकेश मानगांवकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गस्ती पथकाला पो.नि. मानगांवकर यांनी सूचना दिल्या. पथकाने कायनेटिक चौकाजवळ रोडच्या बाजूला दुचाकीवर काही इसम संशियतरित्य थांबलेला असलेले पाहिले. त्यांनी पोलिसांना पाहून दुचाकीसह पळून जात असताना दोन दुचाकींना पाठलांकरून दुचाकीवरील पाच जणांना पोलिसांनी पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक पल्सर दुचाकी, विना क्रमांकाची ऍक्सेस मोपेड दुचाकी, दोन लोखंडी रोड, 4 मोबाइल, मिरची पुडी असे साहित्यासह मुद्देमाल मिळून आला. कोतवाली पोलिस ठाण्यात समीर खोजा शेख याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत तर परवेज मेहमूद सय्यद यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार,पोसई मनोज कचरे, पोना गणेश धोत्रे, रवींद्र टाकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शहीद शेख, पोकाॅ भारत इंगळे, सुमित गवळी, योगेश कवाष्टे, कैलास शिरसाट, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, सुजय हिवाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.Post a Comment

0 Comments