Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तरुण-तरुणींनी संभाळले भरोसा सेलचे कामकाज ; पोलीस रेझिंग डे उपक्रम, पोलीस मित्र संघटनेचा सहभाग

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : पोलीस स्थापनादिन सप्ताहनिमित्त शुक्रवारी (दि.९) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये एक दिवसाच्या कामकाजाची जबाबदारी पोलीस मित्र संघटनेतील तरुण-तरुणींनी संभाळली. यावेळी तरुण-तरुणींनी पीडितांच्या व्यथा, वेदना समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
 भरोसा सेलच्या प्रमुख तथा पोलीस उप निरिक्षक पल्लवी उबरहंडे यांनी प्रथम पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा शारदा हाेशिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना सेलमधील कामाकाजाची माहिती दिली. त्यानंतर हाेशिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या कक्षात थांबून तक्रार घेऊन आलेल्या महिलांच्या अर्जावर कामकाज केले. यावेळी पीडित महिलासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी समजून घेत आपसात वाद मिटवावेत, याबाबत प्रबोधन केले. यावेळी बोलताना पल्लवी उबरहंडे म्हणाल्या समाजात महिलांसह वृद्ध व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत असतात. आपण समाजात वावरत असतांना अशा अनेक बाबी आपल्या निदर्शनास येतात. अशावेळी एक सजग नागरिक म्हणून पीडितेला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अन्याय, अत्याचाराच्या बळी ठरत असेल्या महिलांना एकाच ठिकाणी सर्व कायदेशीर मदत मिळावी, या उद्देशाने भरोसा सेलची स्थापना झालेली आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांचे संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे समाजातील एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपणही पीडितांची मदत करावी. महिलांनी अन्याय सहन न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी यासाठी १०९१ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस हेड कॉस्टेबल उमेश इंगवले, राजू वाघ, सादिक शेख, सुमन दिघोळे, पोलीस नाईक स्वाती कुचे, सुलभा अवटी, अनिता विधाते, योगिता साळवे, स्वाती ढवळे, साेनिया पारधे, सोनाली रोहकले, सुनीता पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments