Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री क्षेत्र बालमटाकळीत शुक्रवार पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.....!सप्ताहास अनेक नामवंत महाराजांची
 राहणार उपस्थिती....!
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बालमटाकळी येथील नारायणदास गडावर भगवान पांचाळेश्वाराच्या कृपा आशीर्वादाने व स्वानंद सुखनिवासी वै. पुज्य नारायणदास महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने ह.भ.प.गुरुवर्य बालकदास महाराज मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभ हस्ते शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील नारायणदास गडावर अखंड हरीनाम सप्ताह तसेच गुरुचरित्र पारायण सोहळा व श्रीमदभागवत कथा महोत्सवाचे भव्य असे आयोजन करण्यात आले.  दि. १५ जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी ह.भ.प. विक्रम महाराज पुरी गुंतेगावकर यांचे प्रवचनाचा तर रात्री ह.भ.प. महंत बाबा गिरी महाराज काशी केदारेश्वर संस्थांन यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. १६ जानेवारी रोजी शनिवारी ह.भ.प. किसन महाराज आहेर प्रकाशवड यांचा प्रवाचनाचा तर रात्री ह.भ.प.राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ह.भ.प.प्रशांत महाराज वडघने बोरी पिंपळगावकर यांचा प्रवाचनाचा तर रात्री ह.भ.प. किशोर महाराज भिसे कांबीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. १८ जानेवारी रोजी सोमवारी सायंकाळी ह.भ.प.नाना महाराज शेलार यांचा प्रवाचनाचा तर रात्री ह.भ.प.प.पु.श्री १००८ स्वामी अखंड चैतन्य पुरूजी महाराज श्री क्षेत्र निलकंठेस्वर स. पिंपरखेडा मंठा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. १९ जानेवारी रोजी मंगळवारी ह.भ.प. सुरेश महाराज चौधरी बंगालपिंपळगाळा यांचे प्रवचन तर रात्री ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर कांबी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. २० जानेवारी रोजी ह.भ.प.योगेश महाराज यांचे प्रवचन तर रात्री ह.भ.प.शिवशाहीर समाज प्रभोधनकार कल्याण महाराज काळे भातकुडगावगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि. २१ जानेवारी रोजी गुरुवारी ह.भ.प. संतोष महाराज भारती यांचे प्रवचन तर रात्री ह.भ.प. महंत जनार्धन म. गुरू निगमानंद महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल तर शेवटी नारायनदास गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत बालकदास महाराज यांच्या अमृततुल्य वाणीने काल्याचे किर्तनाने सांगता होईल नंतर महाप्रसदाची पंगत होईल अशी माहिती श्री क्षेत्र बालमटाकळी येथील नारायनदास गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत बालकदास महाराज यांनी दिली असून बालमटाकळी सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिमान सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन श्री क्षेत्र बालमटाकळी येथील नारायनदास गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत बालकदास महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments