Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत :- आ. विनायक मेटे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - महाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत. यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे नाही म्हणूनच सरकार न्यायालयामध्ये वारंवार चुका करत आहे असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. 

काल सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करून २५ जानेवारीच्या अंतिम सुनावणीसाठी आमची तयारी झाली नाही, आम्हास आणखी काही तयारी करण्यासाठी वेळ हवा आहे, कागदपत्रे मुंबई वरून आणायची आहेत त्यासाठी अंतिम सुनावणी पुढे घ्यावी अशी मागणी केल्यामुळे काल दि. २० जानेवारी २०२१ रोजी अचानक सुनावणी होऊन 2 आठवडे सुनावणी पुढे गेली आहे. मग शासन मागील एक वर्षांपासून काय करत होते? एक वर्षानंतरही  यांची तयारी होऊ शकत नाही ,सरकारच्या मनामध्येच आरक्षणाबाबत खोट आहे. त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. त्याकरिताच हे सर्व नाटक सुरू आहे. असेही मेटे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार आणी ना. अशोक चव्हाण यांना सुनावणी पुढे ढकलायची आहे आणि आणि दुसरीकडे सर्व विभागाच्या मराठा तरुणांना बाजूला ठेवून भरती प्रक्रिया करून घ्यायची असे षड्यंत्र सरकार व ना अशोकराव चव्हाण यांनी आखले आहे, हे अत्यंत वाईट आहे. MPSC( महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सतत नवीन अटी मराठा समाजाच्या व खुल्या वर्गाच्या विरोधामध्ये पत्रक काढत आहे अटी लादत आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये अर्ज करून तर हद्द ओलांडली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी जातीयवादी भूमिका MPSC नी कधी घेतली नव्हती, की आज घेत आहे. या सर्वांच्या पाठीमागे मंत्रालयातील मोठी मंडळी असल्याशिवाय हे धाडस करू शकत नाही. हे जातीयवादी आणि झारीतील शुक्राचार्य वर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि MPSC सर्व परीक्षा निकाल लागत नाही तोपर्यंत पुढे ढकलल्या पाहिजेत. अशीही मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments