Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर करोडी ग्रामपंचायतीत परिवर्तन ! ; जय शनीमारुती ग्रामविकास परिवर्तन व शनीमारुती प्रतिष्ठान विकास पॅनलची युती

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या करोडी ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जय शनीमारुती ग्रामविकास परिवर्तन व शनीमारुती प्रतिष्ठान विकास या दोन्ही पॅनलने मोठ्या खुबीने आपले उमेदवार निवडून आणले. यानंतर दोन्ही पॅनल युती करीत जय हनुमान पॅनलला करोडी ग्रामपंचायतीमधून बाहेर ठेवण्यासाठी व्यहूरचना केली आहे.

करोडी ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्ष सलग सत्तेत असणारे तसेच पाथर्डी पंचायत समिती माजी सदस्य राहिलेले डॉ. राजेंद्र खेडकर यांच्या जय हनुमान पॅनलला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सतीश गोल्हार, शिवनाथ वारे आणि विठ्ठल खेडकर यांचा जय शनिमारुती ग्रामविकास परिवर्तन आणि आश्रुबा खेडकर व बाबासाहेब खेडकर यांचा शनीमारुती प्रतिष्ठान विकास पॅनलने चांगलीच व्यूहरचना आखली होती. यामुळे या 2020 च्या करोड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही पॅनल यांनी युती करून सरपंच आरक्षण पडल्यानंतरही आपलाच सरपंच करण्यासाठी मोठी खेळी केली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे जय हनुमान पॅनलला पर्यायाने डाॅ. राजेंद्र खेडकर यांना विरोधी दोन्ही पॅनलने चांगलाच कात्रजचा घाट दाखविला असल्याचे म्हटले जात आहे.
जय शनिमारुती ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार - सुनिता संतोष गोल्हार, मंगल विश्वनाथ वारे, दिनकर काशिनाथ खंडागळे आणि शनीमारुती प्रतिष्ठान विकास पॅनलचे विजयी उमेदवार - आश्रुबा भागिनाथ खेडकर, बाबासाहेब माधव खेडकर, मनीषा सतीश खेडकर. आणि जय हनुमान पॅनलचे विजयी उमेदवार - राजेंद्र मुरलीधर खेडकर, सविता सागर खेडकर, सुनिता नरेंद्र खेडकर.
👉उमेदवारांना पडलेले मते याप्रमाणे- सर्वसाधारण व्यक्ती - पांडुरंग पंढरीनाथ खेडकर (9), राजेंद्र मुरलीधर खेडकर (187), विठ्ठल सर्जेराव खेडकर (109), विष्णू देवराव खेडकर (7).
सर्वसाधारण स्‍त्री राखीव - कविता अजिनाथ खेडकर (128), मनिषा संतोष खेडकर (29), मंदाबाई बाजीराव खेडकर (114), सविता सागर खेडकर (163), सुनील नरेंद्र खेडकर (175), सुनंदा विष्णू खेडकर (13), नोटा ( 2).

मागास प्रवर्ग व्यक्ती - आश्रूबा भागिनाथ खेडकर (236), उद्धव महादेव खेडकर (141), योगेश नवनाथ गोल्हार (119), नोटा (11).
सर्वसाधारण व्यक्ती - बाबासाहेब महादेव खेडकर (248), अर्जुन कुंडलिक वारे (225), नोटा (34).
सर्वसाधारण स्‍त्री राखीव - मनिषा संतोष खेडकर (294), मिनाबाई बाळासाहेब भाबड (195), नोटा (18).
अनु.जाती व्यक्ती- दिनकर काशिनाथ खंडागळे (242), शाहीनाथ शंकर खंडागळे (96), नोटा (6).
ना.मा.प्रवर्ग स्ञी राखीव- मनकर्ना विष्णू वारे (116), मंगल शिवनाथ वारे (224), नोटा (4).
सर्वसाधारण स्ञी राखीव- ज्योती भागवत गोल्हार (97), सुनिता सतीश गोल्हार (237), विमल गिन्यानदेव ढोबळे (7), नोटा (3).

Post a Comment

0 Comments