Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्राला जपले पाहिजे- आ. संग्राम जगताप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- आपल्या शहराचा कला आणि कलाकारांचा वारसा जपत असताना येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कळावी त्यातून त्यांनी सुसंस्कृत व्हावे तसेच नाट्य-चित्रपट- सांस्कृतिक क्षेत्राला वैभव प्राप्त व्हावे हीच शहराची ओळख असते असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर शहराला हक्काचे नाट्यगृह व्हावे यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शासनाकडे पाठपुरावा करून ५ कोटी निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. सदर नाट्यगृहाचे काम अधिक गतिमान होणार असून तत्पूर्वी शहरातील ज्या कलाकारांना या ठिकाणी काम करायचे आहे त्यांना निमंत्रित करून आ.जगताप यांनी रसिक ग्रुप चे अध्यक्ष जयंत येलूलकर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख समन्वयक शशिकांत नजान , नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे, जेष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी, सदानंद भणगे , श्रेणीक शिंगवी ,शिरीष मोडक , युवा रंगकर्मी क्षितिज झावरे,स्वप्नील मुनोत, निनाद बेडेकर , नगरसेवक अजिंक्य बोरकर , डॉ.सागर बोरुडे , निखिल वारे,बाळासाहेब पवार,उद्योजक अमोल गाडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, महापालिका अधिकारी मनोज पारखे,वैभव जोशी ठेकेदार रसिक मुथ्था यांच्या समवेत प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथील नाट्यगृहची पाहणी केली.
आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की नागरी सुविधा व इतर विकास कामे करणे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे परंतु संस्कृती जतन करणे हे येणाऱ्या अनेक पिढ्यांचे देणे आहे म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम नाट्यगृहापैकी एक ठरावे असे नाट्यगृह अहमदनगर शहरात तयार व्हावे यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असून कलाकारांनी आपल्या शहरातील ही अमूल्य वास्तू कशी असावी,त्यात काय काय सुविधा असाव्यात या बाबत सूचना करावी.
यावेळी बोलताना जयंत येलूलकर म्हणाले की कला संस्कृती ही शहराची ओळख असते. यातून सुसंस्कृत समाजामनं तयार होतात ही बाब महत्वपूर्ण आहे.आपल्या शहराला ऐतिहासिक महत्व आहे, ही संतांची भूमी आहे तशी कलाकारांची खान आहे.त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी नाट्यगृह तयार होणे काळाची गरज आहे याच बरोबर आ.संग्राम जगताप यांनी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या समवेत अहमदनगरच्या पर्यटन विकासा संदर्भात बैठक घेतली आहे भविष्यात अहमदनगर शहर सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राचे केंद्र व्हावे अशी येलूलकर यांनी आशा व्यक्त केली.
शशिकांत नजान म्हणाले की शहरातील नाट्य चळवळ प्रभावी असून नाट्य,चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमात अहमदनगरचे कलाकार,तंत्रज्ञ,लेखक नावारूपाला आले आहेत त्यांच्या प्रगती साठी हक्काचे नाट्यगृह अत्यावश्यक आहे.
यावेळी चित्रपट निर्माते,अभिनेते,स्वप्नील मुनोत,क्षितिज झावरे, नाट्य परीषद अध्यक्ष अमोल खोले,जेष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी,शिरीष मोडक, सतीश शिंगटे,श्रेणीक शिंगवी,सदानंद भणगे ,पोपट धामणे , प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला रसिक ग्रुप आणि चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि सर्व नाट्य संस्थांच्या व कलाकारांच्या वतीने जयंत येलूलकर आणि शशिकांत नजान यांच्या हस्ते आ.संग्राम जगताप यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आभार निनाद बेडेकर यांनी मानले.कार्यक्रमानंतर आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक देवशीष शेडगे, अभय गोले, प्रा.ज्योती कुलकर्णी,नाट्यकर्मी प्रशांत जठार, संजय लोळगे, अनंत रिसे, पुष्कर तांबोळी,वैभव कुऱ्हाडे, दत्ता पवार, अविनाश कराळे, अभिजित दळवी, सुदर्शन कुलकर्णी, स्वप्नील नजान,चाणक्य नेहुल, गजेंद्र क्षीरसागर, पराग पाठक , स्नेहल उपाध्ये, दिपाली देऊतकर, नंदकिशोर आढाव, बाळासाहेब नरसाळे, शैलेश राजगुरू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments