Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल चोरी करणारी दोघे मुद्देमालासह जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 




ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - दुकानातून मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. मोईन मोहम्मद पठाण (वय 21 रा. डावखररोड बसस्थानक मागे, ता. श्रीरामपूर), बंटी अमर सिंग (वय 24 मूळ रा. धानुकापूर जि. भिंड, राज्य मध्यप्रदेश, ह. रा खैरेचाळ स्टेशन रोड अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहता येथे शिवम ट्रेडिंग भुसार मालाच्या दुकानातील काऊंटरवरून रेडियम 6 कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना सदरचा गुन्हा हा मोईन पठाण याने व त्याचे साथीदार यांनी केल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार श्री कटके यांनी त्यांच्या पथकाला सूचना देऊन मोईन पठाण व बंटी सिंग या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिस खाक्या दाखवताच दोघांनी साथीदार बाबर चाॅद मोहम्मद शेख (रा. वॉर्ड नं 1 हुसेननगर ता. श्रीरामपूर) असे तिघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. चोरलेला 9 हजार रुपये किंमतीचा रेडमी 6 हा मोबाईल काढून दिला. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी राहता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून मोईन पठाण याच्यावर यापूर्वी कोतवाली, तोफखाना, शिर्डी, भिंगार, श्रीरामपूर, राहुरी, नगर, कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ भाऊसाहेब काळे, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकॉ रवींद्र घुंगासे, संदीप दरंदले, प्रकाश वाघ, मयूर गायकवाड, चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments