ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - शिर्डी ही साईबाबांची पुण्यनगरी असल्याने या भागात साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणारणाही याची काळजी वाहनचालकांनी घेतली पाहिजे, कोणत्याही भक्तांला त्रास होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे,असे प्रखर मत शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी वेक्त केले.
सावळीविहिर येथील अॅपेरिक्षा चालकांच्या वतीने शिर्डी येथे नव्याने रुजू झाकले पो.नि.न्याहळदे याचा नुकताच सत्कार करण्यात आला, या वेळी विजय भोसले,भाऊसाहेब सातदिवे,प्रशांत भारुड, जॉन कोळगे, अमर झिंझुर्डे, गणेश भारुड आदी रिक्षा चालक उपस्थित होते.
पो.नि न्याहळदे पुढे म्हणाले की, नियमात जर आपण असाल तर उत्तम. परंतु नियम मोडल्यास कारवाईला सामोरे जावा लागेल. या प्रसंगी वाहतुकीचे नियमाबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही,असे ही ते म्हणाले. जर तुमची काही अडचण असेल तर आम्हाला कळवा आपण योग्य मार्ग काढू,परंतु कोणत्याही साईभक्त,जनतेला आपला त्रास होणार नाही आपण ही काळजी घेतली पाहिजे. कोविड च्या काळात आपण स्वतःची काळजी घ्या. परिवाराची काळजी घ्या असे शेवटी त्यांनी सांगितले, उपस्थित चालकांनी आपल्या पासून वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन: राजेंद्र दुनबळे
0 Comments