Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राहुरी तालुक्यात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राहुरी - तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीपमधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडीत परप्रांतीय(बंगाली) महिलेची सुटका व एक आरोपीस ताब्यात घेतले.शुक्रवारी ( दि.२९) श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप (चिंचोली फाटा ता. राहुरी) हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे हा पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली होती. या माहितीवरून हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकण्यात टाकण्यात आला. यावेळी दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली. आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पी आय गाडे, सफौ. राजेंद्र आरोळे,पोहेकाँ सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पोकाॅ रवींद मेढे, सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments