ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - येथील सुरभी हॉस्पिटल मधील नव्या प्रशस्त अशा 200 खाटांच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 24 ) दुपारी 1.30 वाजता होणार असल्याची माहिती 'सुरभी'चे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश गांधी यांनी दिली.
औरंगाबाद महामार्गावरील गुलमोहररोड कॉर्नर येथे सुरु झालेल्या 'सुरभी हॉस्पिटल'चे विस्तारित इमारतीच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार अरुण जगताप हे असून यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंञी बाळासाहेब थोरात, मंत्री शंकराव गडाख, प्राजक्त तनपुरे, खा. सुजय विखे पा. खा. सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
फॅमिली डॉक्टरांनी एकत्र येऊन उत्तम वैद्यकीय सेवेचे स्वप्न पाहिले. फॅमिली डॉक्टर यांच्या संकल्पनेवर आधारित या सुरभी रुग्णालयाची उभारणी केली आहे. सध्या 65 खाटांचे असलेले सुरभी हॉस्पिटल नव्याने विस्तारित इमारतीमुळे आता 250 घाटाच्या प्रशस्त रुग्णालयमध्ये रूपांतरीत झाले आहे. अवघ्या दोनच वर्षात समाजाने दाखवलेल्या विश्वासामुळे सुरभी हॉस्पिटल प्रगतीचे हे शिखर गाठू शकले आहे. या रुग्णालयात सर्व रोगावरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. यामुळे पुण्याच्या धर्तीवर याठिकाणी रुग्णांना उपचार मिळणार असल्याचे डॉ. गांधी यांनी सांगितले.
यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अशिष भंडारी, सीईओ डॉ. अमित पवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश जंगले, संचालक डॉ. मंदार शेवगावकर, डॉ. अमित पवळे, डॉ. सुनील आवारे, डॉ. नितीन फंड, डॉ. प्रितेश कटारिया, डॉ. दीपक जाधव, डॉ. विनायक शिंदे, डॉ. निशांत त्रिपाठी, डॉ. चंद्रशेखर जंगम आदी या वेळी उपस्थित होते.
0 Comments