Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरार आरोपीस एलसीबी पथकाने केले जेरबंद

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - खुनाचा प्रयत्न करणारा एक वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. हरीश उर्फ गुंड्या मच्छिंद्र नेटके (वय 30 रा. ,भारस्कर कॉलनी लालटाकी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी बोंद्या उर्फ दया मच्छिंद्र नेटके व त्याचा भाऊ हरीश नेटके यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून तात्या हरी खंडागळे यांचा मुलगा प्रकाश तात्या खंडागळे यास धारदार हत्यारांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आरोपी हरीश नेटके हा फरार झाला होता. तो बोरुडे मळा परिसरात लपून छपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबी पथकाने सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. 
एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ बबन माखरे, दत्तात्रेय इंगळे, संदीप पवार, शंकर चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments