Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंतप्रधानांनी हा इगो प्रश्न न करता, हे तिन्ही कायदे रद्द करून हा प्रश्न संपवला पाहिजे होता : पालकमंत्री मुश्रीफ

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - दिल्लीत आज ६० दिवस झाले शेतकरी आंदोलन करीत आहेत. यामध्ये ५० भर शेतकरी मयत झाले. वास्तविक पंतप्रधानांनी हा इगो प्रश्‍न न करता आंदोलन मिटवणे गरजेचे होते, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पञकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे, असे सांगतानाच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते, प्रजासत्ताक दिनी नगरच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. कृषी कायद्यांना स्थगिती दिली, त्याऐवजी ते रद्द करायला पाहिजे होते, व पुन्हा समजूत काढून ते करायचे होते. ते न करता केंद्र सरकारने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.
दोन तासात संसदेत कायदे मंजूर झाले, हे तर हुकूमशाहीकडे पहिले पाऊल आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली निघणे हे दुर्दैवी आहे,' असेही ते म्हणाले.Post a Comment

0 Comments