Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केडगांव अरणगांव रस्‍त्‍यासाठी निधी उपलब्‍ध करून देणार -आ.संग्राम जगताप


केडगांवच्‍या विकास कामासाठी आ.संग्राम जगताप यांचेकडे रक्‍कम रू.10 कोटीच्‍या निधीची मागणी -  स्‍थायी समितीचे सभापती मनोज कोतकर

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - केडगांव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्‍तार मोठया प्रमाणात वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. रस्‍ते, लाईट, ड्रेनेज , उदयाने सुशोभिकरण असे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगांवच्‍या विकासासाठी जिल्‍हा नियोजन व शासनाकडून 10 कोटीचा निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी स्‍थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली. 
 केडगांव अरणगांव (मेहेरबाबा मार्ग) रस्‍त्‍याचे अत्‍यंत दुर्दशा झाली आहे. हा रस्‍ता जिल्‍हा परिषद अंतर्गत येत असल्‍याने मनपाकडून या रस्‍त्‍याच्‍या विकासकामासाठी निधी उपलब्‍ध होत नाही. जिल्‍हापरिषद मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांचेकडे वेळोवेळी पत्र व्‍यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्‍ध नसल्‍याचे त्‍यांच्‍याकडून सांगण्‍यात येते. नगर दौण्‍ड महामार्गाचे काम सुरू असताना या मार्गावरील वाहतून केडगांव , अरणगांव (मेहेरबाबा ) रस्‍त्‍यावरून वळविण्‍यात आली होती. या रस्‍त्‍यावरून अवजड वाहतुक मोठया प्रमाणात झाल्‍यामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून रस्‍त्‍याची आवस्‍था दयनीय झाली आहे. या भागातील नागरिकांचा हा मुख्‍य रस्‍ता आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून जाणे येणे अवघड झाले आहे. व नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तरी या रस्‍त्‍याच्‍या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी आ.संग्राम जगताप यांचेडे सभापती मनोज कोतकर यांनी केली.
      यावेळी आ. संग्राम जगताप यांनी सांगितले की लवकरच या रस्‍त्‍याच्‍या कामाची पाहणी करून लवकरच शासनाकडून निधी उपलब्‍ध करून देवू व केडगांवच्‍या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करून देव असे ते म्‍हणाले. 


Post a Comment

0 Comments