Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनल विजयी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ नेते शामराव पाटील बडे व भा .ज. पा चे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते धनंजय पाटील बडे यांच्या पॅनलचे सर्वाधिक जास्त उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी मिनी लोकसभा निवडणूक समजली जाणारी जिल्हा परिषदेच्या पूर्व भागातील जागेसाठी धनंजय बडे यांनी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

या निवडणुकीत स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनल तसेच पोपट बडे यांच्या अंगठेशाही परिवर्तन पॅनेल आणि मळाईदेवी परिवर्तन पॅनल मानेवाडी यातील पॅनलमध्ये चांगलीच रस्सीखेच झाली. यात ग्राम परिवर्तन पॅनलचा फक्त एकमेव उमेदवार वॉर्ड नंबर एक मधून पुरुषोत्तम नामदेव रंधवे हे निवडून आले आहेत.
यामुळे येणाऱ्या काळात सरपंच पद आरक्षण सोडतीमध्ये मागासवर्गीय आरक्षण निघाल्यास सरपंच पदासाठी श्री रंधवे हे दावेदार असणार आहेत. त्यामुळे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलला सरपंचपदापासून दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड नंबर तीन मध्ये सर्व पॅनलने लक्ष केंद्रित केल्याने येथे चांगलीच रस्सीखेच झाली होती.
वार्ड नंबर 3 मधून सर्वसाधारण व्यक्तीमधून -उद्धव भगवान केदार (मते 180), आजिनाथ सिताराम बडे ( मते 272 विजयी), रघुनाथ काशिनाथ बडे (मते 268), नोटा (6).
ना.मा. प्रवर्ग स्ञी राखीव- प्रगती धनंजय बडे (मते 350 विजयी), प्रतिभा गोविंद बडे (मते 140), स्वाती सुभाष बडे (मते 231), नोटा (5).
सर्वसाधारण स्ञी राखीव- भामाबाई ज्ञानदेव बडे (226), शोभा गहिनीनाथ बडे (218), सखुबाई गहिनाथ बडे (263विजयी), नोटा (19).
सर्वसाधारण व्यक्ती -सोमनाथ पोपट पोफळे (155), ज्ञानदेव महादेव मेरड (विजयी305), नोटा (10).
सर्वसाधारण स्‍त्री राखीव - शिलाबाई धोंडीबा धायतडक (विजयी310), शोभा नारायण (131), सीमा शिवाजी बडे (166), कुसूम नारायण बारगजे (विजयी311).
अनु.जाती - पुरुषोत्तम नामदेव रंधवे (विजयी 306), विक्रम मारुती साखरे (296), नोटा (14).
ना.मा.प्रवर्ग- विष्णु शंकर खाडे (विजयी397), अमोल नवनाथ बडे (212), नोटा (7)
सर्वसाधारण स्ञी - कडूबाई रावसाहेब बडे (358 विजयी), गोदावरी पोपट बडे (250), नोटा (8).
संकलन -पत्रकार सोमराज बडे
मोबा-9372295757Post a Comment

0 Comments