Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

समृद्धी महामार्गाला धर्मवीर छञपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव द्यावेत, अन्यथा उपोषण ; छावा क्रांतिवीर सेनेचे विश्वनाथ वाघ यांचा इशारा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर / कोपरगाव - धर्मवीर छञपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव समृद्धी महामार्गाला द्यावे, आणि समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, संघटनेच्या पाठपुरावा केला असता, झालेला दंड वसुल करावा अन्यथा दि.19 जानेवारीला उपोषण करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 
निवेदन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंञी बाळासाहेब थोरात, नाशिक विभागीय आयुक्त, अहमदनगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.Post a Comment

0 Comments