Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कमेसह सोनेचांदीच्या ऐवज केला लंपास

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथे शनिवारी भर दिवसा अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोनेचांदीच्या मौल्यवान ऐवज लंपास केल्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण होऊन दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथील बबन उत्तम आंधळे हे शेतकरी राहत्या घरास कुलूप लावून शेतात कांदे लावण्यासाठी कुटुंबासह गेले होते. या दरम्यान चोरट्याने फायदा घेत भर दुपारीच घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील समानाची उचकपाचक करून आठ ग्राम सोन्याचे कर्णफुले, सोन्याची 5 ग्रामची अंगठी, 7 ग्रामचा सोन्याचा गळ्यातील हार, चांदीच्या पायातील पट्ट्या, व रोख रक्कम असा एकूण 49 हजार रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार सायंकाळी आंधळे कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर उघडीस आला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र कोणीच फिरकले गेले नाही आज रविवारी बबन आंधळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरांच्या विरोधात शेवगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 
शनिवारी दुपारी गोळेगाव-बोधेगाव रोडवर काळ्या रंगाची प्लसर गाडीवर तिघेजण घुटमळत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले असल्याची माहिती प्रकाश आंधळे यांनी दिली 
ग्रामस्थांनी पाठलाग करून आरडाओरड करताच चोरट्याने पळ काढला घटनेची माहिती बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राला दिली. मात्र पोलिसांनी तातडीने दखल घेतली नाही. गोळेगाव, शेकटे, लाडजळगाव भागात गेल्या तीन चार महिन्यात चोरीच्या अनेक घटना घडल्या मात्र एकाही घटनेचा पोलिसांना तपास लागला नाही एका घटनेत ग्रामस्थांनी पाठलाग करून चोरट्याचे वाहन सापडले गेले होते मात्र सखोल चौकशी न करता पोलिसांनी थातुरमातुर तपास केला बोधेगाव येथील पोलिसांची नेहमी भूमिका संशयास्पद राहिली असल्याचा आरोप प्रकाश आंधळे यांनी केला आहे सदर घटनेचा तातडीने तपास लावण्यात यावा व रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी ग्रामस्थांतुनजोरदार मागणी होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पोलिसांच्या भूमिका बद्दल नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
👉पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांची श्रीगोंदेला बदली होऊनही शेवगावचे ठाणे अंमलदार .....?
शेवंगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांची श्रीगोंदा येथे बदली होऊन तिथे हजर झाले शेवगावला पाटील म्हणून पोलीस निरीक्षक हजर झाले आहेत. मात्र अजूनही शेवगाव पोलीस ठाण्याचा कारभार ठाणे अंमलदार म्हणून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या नावाने अधिपत्याखाली सुरू आहे. सदर चोरीची घटना घडल्यानंतर तक्रारदाराना गुन्हा दाखल झाल्याची प्रत दिल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आहे. शेवगाव पोलीस ठाण्याच्या भोंगळ कारभार उघड झाला आहे.

संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments