Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नायलॉन मांजा विक्री करणा-या पतंग विक्रेत्यांवर कोतवाली पोलीसांचा छापा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर शहरात धोकादायक नायलॉन मांजाची विक्री करणा-या विक्रेत्यांवर कोतवाली पोलीसांनी कारवाई केली.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग करुन नगर शहरातील काही दुकानदार नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत. मांजाची विक्री करणा-यांची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांच्या पथकाने नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानदार तसेच नायलॉन मांजाने पतंग उडविणारे इसमांवर कारवाई केली. या कारवाईत कन्हैय्या पतंग सेन्टर .डिगेट, A १ पतंग सेन्टर देशपांडे हॉस्पिटलजवळ माउली पतंग भूषणनगर केडगाव, S पतंग केडगाव यांच्यावर छापा टाकून त्यांचे दुकानातून एकुण ७ हजार ९५० रु किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

दि ४ जानेवारीले श्रध्दा जनरल पतंग सेन्टर भोसले आखाडा, वाघमारे पतंग सेन्टर गुगळे कॉलेज शेजारी, क्रुष्णा आर्ट पतंग सेन्टर शिवाजी नगर कल्याण रोड, लक्ष्मी कॉर्नर पतंग सेन्टर शनिचौक अ नगर यांच्यावर छापा टाकून दुकानातून एकूण ५ हजार ३१० रु किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. सदरच्या नायलॉन मांज्याच्या विक्री व वापरामुळे पक्षांना, प्राण्यांना व मानवी जिवीतास इजा होवुन अपघात घडणे किंवा जिवीत हाणी होवू शकते. हे माहीत असताना देखील सदर दुकानदार यांनी या मांजाची विक्री करुन महाराष्ट्र शासन निर्णय सी.आर.टी- २०१५ / प्र क्र /३७/ता.क्र / ०२ , दि १८/०६/२०१६ अन्वये शासनाने काढलेल्या अधिसुचनेच्या आदेशाचा भंग करताना मिळुन आल्याने सदर दुकान चालक यांच्यावर भादवि १८८, ३३६ सह पर्यावरण संरक्षण अधिनीयम १९८६ चे कलम ५.१५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल शरद ढुमे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोतवालीचे पो.नि राकेश मानगांवकर, सपोनि विवेक पवार , सपोनि भंगाळे, पोना रविंद्र टकले, पोना गणेश धोत्रे, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकॉ प्रमोद लहारे, पो.कॉ कैलास शिरसाठ, पोकाँ भारत इंगळे , पोकॉ सुमित गवळी, पो.काँ योगेश कवाष्टे, पोकों तान्हाजी पवार, पोकाँ सोमनाथ राउत , पोकाँ सुशिल वाघेला, पोकाँ सुजय हिवाळे आदिंच्या पथकाने कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments