Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील गुन्हेगार जेरबंद केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांच्या वेगवान तपास करून गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करून गावठी कट्टे व इतर साहित्य जप्त केलेल्या कारवाया बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके व सहाय्यक निरीक्षक शिरिषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अनील कटके, शिरिषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे, शंकर चौधरी दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, सचिन आडबल प्रकाश वाघ, मलेश पाथरूड, दीपक शिंदे, रवी सोनटक्के होते .


कर्जत तालुक्यातील बाबळगाव खालसा मधील सराफाला लुटणारे टोळी मुद्देमालासह जेरबंद केली कामगिरी. कुख्यात गुंड बंटी राऊतला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात एलसीबी ची मोठी कारवाई. जामखेड तालुक्यातील जवळा येथील गावठी काट्यातून गोळीबार करणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आत जेरबंद केलेली कामगिरी,शेवगाव पाथर्डी तालुक्यातील रस्ता लूट करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद केली होती .जिल्ह्यातील वेगवेगळ्या चारचाकी व दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जालना येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळविले
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजूरमध्ये मोबाईल शॉपी फोडून सुमारे तीन लाखांच्या ऐवजाची चोरून नेला होता तो पथकाने नाशिक जिल्ह्यातून हस्तगत केला कारवायाबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments