Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्युत ट्रांसफार्मर चोरी करणारा अटक ; कोतवाली पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - विद्युत ट्रान्सफार्मर चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. कचरू भुसारी (रा. आखतवाडी ता. शेवगाव जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली ठाण्याचे पोनि राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरोपी भुसारे याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात आले. 
त्याला पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा विद्युत ट्रासफार्मर व 3 लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीचा पिकप (एमएच16 एवाय 1163) असा एकूण 4 लाख 59 हजाराचा मुद्देमाल पोलीसांची जप्त केला आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पो.नि राकेश मानगांवकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, पोकॉ भारत इंगळे, सुमित गवळी, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, सुजय हिवाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments