Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर  :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अहमदनगर यांचेतर्फे जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवती, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवारांसाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण काय्रक्रमाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीस प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY 3.0 या योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावयाची असल्याने या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्हा कौशल्य विकास समितीने      सेल्फ एम्प्लॉईड टेलर,  फिल्‍ड टेक्निशियन ऑदर होम अप्लायंसेस, सीसीटीव्ही  इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, कन्साईनमेंट बुकिंग असिस्टंट, वेअरहाऊस पॅकर,  रिटेल सेल्स असोसिएट, मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर, आदी विविध क्षेत्रांमधील विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केलेले आहे.
याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास विभाग सहकार्य करत आहे. प्रशिक्षण क्षेत्र व अर्जाचा नमुना कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज https://www.facebook.com/ahmednagar.skill येथे तसेच कार्यालयातही उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र, अहमदनगर या कार्यालयात उपलब्ध प्रशिक्षण फॉर्म  सकाळी 10 ते  सायंकाळी 5 या वेळेत भरुन देण्यात यावा अथवा कार्यालयास डाक, ई-मेलव्दारे पाठविण्यात यावा. याबाबत काही अडचणी असल्यास  दूरध्वनी क्र. 0241- 2425566 या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन वि. जा. मुकणे,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अहमदनगर  यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments