Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महापालिका प्रशासन गतीमान करा : जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले

 

महानगर पालिका कामकाजाचा आढावा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आज महानगरपालिकेत विभागप्रमुखांची पहीली आढावा बैठक घेऊन कामकाजाचे नियोजन करून प्रत्येकाने आपल्या विभागाचा पुढील एक महिन्यात काय कामकाज करणार याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. तसेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मार्केट विभागाला विशेष सुचना देऊन नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या.
महानगरपालिकेची संकलित कर थकबाकी मोठी असून मागील थकबाकीसह चालू संकलित कर वसूलीसाठी विशेष प्रयत्न करावेत वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई करून कर वसूली करण्याची आदेश या वेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत प्रभाग समिती निहाय नियोजन करुन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याच्या सुचना अतिक्रमण विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या भागात रस्ते खोदाई झाली असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या भागातील रस्ते दुरुस्ती करून व अतिक्रमणे एका आठवडयात काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अमृत पाणी व भूयारी गटार योजेनेच्या कामाला गती देऊन ते जलद गतीने पुर्ण करावे, महानगरपालिका अधिनियमांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी दरारा निर्माण करावा आपल्या कामातून छाप निर्माण करावी अशी सूचना यावेळी डॉ. भोसले यांनी यावेळी दिल्या.
दैनंदीन स्वच्छता, आरोग्य सेवा, दिवाबत्ती, घनकचरा संकलन, अंत्यविधी सुविधा आदी सेवांचा आढावा घेऊन मोकाट जनावरे - कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.
बैठकीस उपआयुक्त डॉ प्रदीप पठारे, संतोष लांडगे, सहा. आयुक्त सचिन राऊत, दिनेश सिनारे, डॉ. नरसिंह पैठणकर प्रविण मानकर, सुरेश इथापे, कल्याण बल्लाळ, रोहीदास सातपूते, शहाजहान तडवी, मेहेर लहारे, अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments