ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथे मुस्लिम समाजाच्या वतीने अयोध्येच्या श्रीराम मंदिर बांधकामासाठी देणगी देण्यात आली असून येथील मुस्लीम समाजाने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे.
अयोध्या राम मंदिर बांधकामासाठी दशमीगव्हाण येथे तरुणांकडून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते यावेळी मुस्लिम समाजाने एकत्र येत श्रीराम मंदिरासाठी वर्गणी दिली. दशमीगव्हाण हे गाव पुर्वीपासुन हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
दशमीगव्हाण येथे नागरिक कोणताही जात पात न मानता सर्व सण उत्साह मिळून साजरे करतात त्याचबरोबर सर्व धार्मिक कामांमध्ये सर्व समाजातील लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदाने आनंद उत्सव साजरा करत असतात.
यावेळी बोलताना प्रा. रवींद्र काळे म्हणाले की दशमी गव्हाण येथील मुस्लिम समाजाने जो ऐकात्मतेचा संदेश घालवुन दिलेला हा आदर्श नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असेल जात धर्म यापलीकडेही माणुसकीचे नाते असते ते नाते सर्वांनी जपणे आवश्यक आहे हे त्यांनी दाखवुन दिले.अशाचप्रकारे सर्वांनी माणुस म्हणुन समाजात वावरायला हवे. कोणताही जातीभेद न करता सर्वांनी एकत्रित येऊन गाव विकासासाठी तसेच एकमेकांच्या सुख दुःखा मध्ये सहभागी झाल्यास नक्कीच एकोपा टिकून राहतो व तो एकोपा दशमिगव्हण गावांमध्ये टिकून असल्याचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे असे मत व्यक्त केले.
0 Comments