Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...याप्रकरणाशी पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री ? - आ.अतुल भातखळकर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मंञी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या घटनेनंतर भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत ते म्हणाले की, राज्यामध्ये कोणत्याही अधिकार पद नसताना शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याबाबत भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री ?, असा सावल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर विश्वास नांगरे पाटील काय भूमिका मांडतात, याकडे पोलिस प्रशासनासह महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलं आहे.
Post a Comment

0 Comments