Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रा. डॉ. परदेशी यांना मार्केटिंग मॅनेजमेंट विषयात पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून मान्यता

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या आयबीएम आरडी कॉलेजचे सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन शाखे अंतर्गत मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
डॉ.परदेशी यांनी मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयांमध्ये संशोधनपर 32 शोधनिबंधाचे लेखन व प्रकाशन केले आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात यापुढे पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपलब्ध ज्ञानामध्ये मोलाची भर घालण्याचा मानस डॉ. परदेशी यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे पाटील तसेच संस्थेचे महासचिव डॉ. सदानंदा संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ. पीएम गायकवाड आदींनी डॉ. परदेशी यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments