Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरपीआय महिला संतप्त ; रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही !

 

NR ऑनलाइन न्यूज नेटवर्क
पुणे :  आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगीता आठवले म्हणाल्या की, लायकी नसणाऱ्या महिलेने केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्यावर वक्तव्य केल्याने, हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. 
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या संगीता आठवले, नगरसेविका सुनीता वाडेकर, शकीला वाघमारे, संघमित्रा गायकवाड आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ‘मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही असं वक्तव्य आठवले यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली होती’.
‘रामदास आठवले यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल जे वक्तव्य केलं, ते मोर्चात सहभागी २५ ते ३० हजार शेतकरी आंदोलकांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. दिवसभर कविता करण्यात व्यस्त असलेल्यांनी शेती कशी करावी, याचीही माहिती घ्यावी. र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला होता.
दरम्यान, रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरावर आरपीआयच्या वतीने बुधवारी निदर्शने काढण्यात आली. यावेळी आरपीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत चाकणकर यांच्या घराच्या परिसरात निदर्शने केली.Post a Comment

0 Comments