Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

" जैन कॉनफरन्स दिल्ली व कोठारी प्रतिष्ठानचा " उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार दैनिक प्रभातचे ओंकार दळवी यांना जाहीर !

महेश बेदरे, ओंकार दळवी, समीर शेख,मिठूलाल नवलाखा, अनिल गायकवाड ठरले पुरस्काराचे मानकरी 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
जामखेड - जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी जाहीर केले असुन यंदाच्या उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार दैनिक प्रभात चे जामखेड तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी,यांना जाहीर झाला आहे सोबतच अन्य पुरस्काराचे वाटप करण्यात येणार असून यामध्ये समीर शेख ( दैनिक सार्वमत ) मिठुलाल नवलाखा ( दिव्य मराठी ) व अनिल गायकवाड ( दैनिक लोकमत ) हे मानकरी ठरले आहेत .
जैन कॉन्फरन्स दिल्ली व कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी( दर्पण)पञकारदिना निमित्त उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, या मध्ये आपल्या लेखनीद्वारे समाजहीताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मापत्र देऊन गौरव केला जाणार आहे .यासंदर्भत माहीती देताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सांगितले की, आपल्या लेखनीद्वारे सर्वसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवुन देणाऱ्या व समाजकार्य जनतेपर्यंत केलेले कार्य पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव होण्याचे गरजेचे आहे, यावर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून हे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन सध्या कोविड चा संकटकाळ सुरु असल्याने त्या पार्श्वभूमीवर एका  कार्यक्रमात या  पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार असल्याची माहीती कोठारी यानी दिली आहे .
....................................................

पत्रकार ओंकार दळवी यांना गेल्या वर्षी ३ राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित
दैनिक प्रभातचे जामखेड तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांनी पत्रकारिता करत असताना उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी  नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्कार. तसेच संविधान महोत्सव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार व शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments