Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जबरी चोरी करणारा, दरोड्यातील आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जबरी चोरी करणारा व दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे (रा. डावखर खळेवाडी ता. राहुरी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी गणेश शेटे याच्यावर राहुरी, लोणी, राहाता, श्रीरामपूर शहर, यरोवडा, चंदननगर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल खटके यांच्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, दीपक शिंदे रवी सोनटक्के, पोकाॅ रणजित जाधव, लक्ष्‍मण खोकले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments