Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पायी जाणाऱ्यांना लुटणाऱ्या दोघांना पकडले ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर -येथे रस्त्याने पायी जात असणाऱ्यांना लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले पंकज राजू माचरेकर (वय 20 ),  शाबीर दिलवार शेख (वय 21 दोघे रा. आंबेडकर कॉलनी वार्ड नंबर 1 श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
दि. नोव्हेंबर 2020 ला रात्री श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाखालून पायी जाताना मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर येणा-या दोन अनोळखी इसमांनी हातातील विवो कंपनीचा वाय 15 हा 10 हजाराचा मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद शेजल चित्ते यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबी पो. नि. अनिल कटके यांना पंकज माचरेकर व त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने श्रीरामपूर येथे जाऊन आरोपी माचरेकर याला पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदार शाबीर शेख असे दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याची माहिती दिली. पथकाने त्याला ताब्यात घेतले. या दोघा आरोपींकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला. दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोना शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके, रवींद्र घुंगासे, चापोहेकाँ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments