Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग काम दुरुस्ती कामादरम्यान वाहतुकीत बदल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अहमदनगर जिल्‍ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्‍यामुळे दि. 4 जानेवारी ते 5 जानेवारी 2021, दिनांक 8 जानेवारी ते दि 9 जानेवारी 2021, दि. 11 जानेवारी 2021 ते 13 जानेवारी 2021 या दिवशी अनुक्रमे चोवीस तासांसाठीची वाहतुक ही पर्यायी मार्गाने वळविण्‍यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
या कालावधीदरम्यान, वाहतुकीसाठीचा पुढीलप्रमाणे मार्ग निश्चित करण्‍यात आलेला आहे.- पुलाचे बांधकामाच्या वेळी अहमदनगर कडुन संगमनेर, येवला, मनमाड, मालेगांव, धुळे कडे जाणारी जड वाहने ही डी.एस.पी. चौक-पांढरी पूल - नेवासा फाटा - कायगाव टोके -गंगापुर मार्गे इच्छित स्‍थळी जातील. अहमदनगर कडुन संगमनेर, येवला, मनमाड, मालेगांव, धुळेकडे जाणारी हलकी व दुचाकी वाहतुकीसाठीचा मार्ग हा डी.एस.पी चौक - राहुरी - राहुरी फॅक्‍टरी - श्रीरामपूर - बाभळेश्‍वर मार्गे इच्छित स्‍थळी असा असेल. शिर्डीकडुन अहमदनगरकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी शिर्डी-कोल्‍हार-बेलापुर-राहुरी फॅक्‍टरी-राहुरी मार्गे इच्छित स्‍थळी जातील. श्रीरामपूरकडुन बाभळेश्‍वरकडे जाण्‍यासाठी एकेरी वाहतुक सुरू राहील. परंतु बाभळेश्‍वरकडुन श्रीरामपूरकडे जाण्‍यास मनाई राहील. कोल्‍हारकडुन बेलापुरकडे जाण्‍यासाठी एकेरी वाहतुक सुरू राहील. परंतु बेलापुरकडून कोल्‍हारकडे जाण्‍यास मनाई राहील, असे सांगण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments