Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबई पोलीस अधीनियम १९५१ च्या कलम ३७ (१) नुसार जिल्ह्यात मनाई आदेश जारी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर :-  अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीत दिनांक 19 जानेवारी 2021 पर्यंत  मुंबई पोलीस अधीनियम कलम ३७ (१) नुसार   प्रतिबंधात्मक आदेश  जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत.   या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आलीआहे.  यात,   शस्त्रे,   काठया,  सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. यास मनाई करण्यात आली आहे.
  हे आदेश खालील व्‍यक्‍तीस आदेश लागु होणार नाही. यामध्ये, शासकीय सेवेतील व्यक्‍तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. 

Post a Comment

0 Comments