Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आई वडिलांच्या हस्ते आरोग्यदायी खोमणे गुळाच्या चहाचे उद्घाटनऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -सावेडी येथील प्रोफेसर चौकात आरोग्यदायी खोमणे गुळाचा चहा चे उद्घाटन मातृ-पितृ भवो : या सुविचारा नुसार श्रीनिवास बोज्जा व तिरमलेश पास्कंटी यांनी आपल्या आई-वडिलांच्या हस्ते केले.
यावेळी आमदार संग्राम  जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे जिल्हा पोलीस उपाधीक्षक मिटके साहेब, खोमणे गुळाचे संचालक राहुल खोमणे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम,सभागृह नेता मनोज दुलम, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तोफखाना पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब नगरसेवक कुमार वाकळे,डॉक्टर सागर बोरुडे, निखिल वारे, योगीराज गाडे,सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, धनंजय जाधव, सौ. दीपाली बारस्कर, सौ. सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, राम नळकांडे, उदय कराळे, फटाका असो चे सचिव संतोषशेठ बोरा, माजी नगरसेवक किशोर डागवाले संपत नलावडे कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र उदागे नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे प्राध्यापक सिताराम काकडे, फटाका असोचे पदाधिकारी सुरेशशेठ जाधव व इतर सदस्य व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
 आमदार संग्राम जगताप म्हणाले खोमणे गुळाचा चहा आरोग्यासाठी हितकारक असून गुळाचा चहा पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच गोळा मुळे अनेक फायदे आपल्याला मिळतात यासाठी नागरिकांनी खोमणे आरोग्यदायी गुळाचा चहाचा स्वाद घ्यावा असे आवाहन केले.
खोमणे आरोग्यदायी गुळाचा चहा या दालनाचे संचालक श्रीनिवास बोज्जा म्हणाले सावेडी उपनगर उपनगरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून गुळाचे चहाचे दालन चहा प्रेमी साठी सुरू केले असून याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्रीनिवास बोज्जा व तिरमलेश पासकंटी यांनी केले.यावेळी यावेळी सर्वांनी खोमणे गुळाचा चहाचा आस्वाद घेतला व चहा पसंतीचा दादही दिला.
यावेळी सावेडी उपनगर परिसरातील डॉक्टर वकील इंजिनिअर असे सर्व स्तरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments