Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मैत्री करून सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यास अटक ; कोतवाली पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- व्हाट्सअपच्या माध्यमातून मैत्री करून सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पकडले. राहुल संजय शिरसाठ, विशाल सदानंद साबळे अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दि.1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शाळा बंद असताना व्हाट्सअपद्वारे एका मुलाशी ओळख झाली. त्यामुळे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यातून त्याने माझ्याकडे अशील फोटोची बळजबरीने मला फोटोची मागणी केली. मी त्याला सदरबाबत नकार दिल्याने त्याने धमकी दिली. तू जर मला आणखी तुझे फोटो पाठव नाहीतर मी तुझे सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी करेल, अशी फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून 354 (ड), 507सह पोक्सो अॅक्ट 12 सह आयटी अॅक्ट 66 (ई), 67(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता, आरोपी हे शेलुखडसे (ता.रिसोड, जि.वाशीम) येथे राहणारे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथके रवाना होऊन आरोपींना रिसोड पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन त्यांच्या राहत्या घरातून आरोपींना ताब्यात घेतले. त्याचे मोबाईल फोन व त्याच्या मित्राच्या फोनद्वारे सदर मुलीस अश्लील संदेश पाठवले तसेच तिचे फोटो इंस्टाग्रामवर आपलोड केल्याचे आरोपींनी कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि विवेक पवार, गुन्हे शाखेच्या पथकाचे गणेश धोत्रे, कैलास शिरसाट, सुशील वाघेला, विष्णू भागवत, नितीन शिंदे, योगेश भिंगारदिवे, शाहिद शेख, रवींद्र टकले, सुमित गवळी, भारत इंगळे, तानाजी पवार, प्रमोद लहारे , सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments