Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद ; तोफखाना पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - निंबळक बायपास रस्त्यावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ ट्रक चालकाला अडवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई तोफखाना पोलिसांनी केली.
अक्षय भीमा गाडे (वय 23 रा. मुद्गलवाडा शिवाजीनगर अहमदनगर), विश्वास नामदेव गायकवाड (वय 21 रा. श्रीटाइल्स चौक एमआयडीसी नगर), निलेश बाळासाहेब कार्ले (वय 22 रा. गजानन कॉलनी वडगाव गुप्ता रोड), निलेश संजय शिंदे (वय21 रा. तांबटकर मळा कोहिनूर मंगल कार्यालयजवळ अहमदनगर), अमोल बाबुराव कणसे (वय 25 रा. भवानी चौक गणराज्य कॉलनी बोलेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके हेकॉ जपे, पोना विलास वाकचौरे, वाशिम पठाण, अहमद इनामदार, धीरज अभंग, पोकाॅ दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोना महेश दाताळ, शब्बीर शेख यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments