Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाेलिस आणि पत्रकारांना राेज परीक्षा द्यावी लागते : मनाेज पाटील

 


पत्रकार दिनानिमित्त केडगाव प्रेस क्लबचा सावली संस्थेत रंगला साेहळा ; पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- पाेलिस स्थापनादिन आणि पत्रकारदिन हे एकाच आठवड्यात साजरे हाेतात हा माेठा याेगायाेग आहे. पाेलिस अधिकारी होण्यापूर्वीपासून पत्रकार आणि माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. केडगाव प्रेस क्लबच्या कायक्रमात पुन्हा सर्व पत्रकारांना एकत्र भेटण्याची संधी मिळाली. पाेलिस आणि पत्रकार यांचे जीवन सारखेच आहे, आपल्याला दरराेज परीक्षेला सामाेरे जावे लागते, असे प्रतिपादन पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी केले.

केडगाव प्रेस क्लबच्या वतीने सावली संस्थेत आयोजित पत्रकारदिनाच्या कायक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. यावेळी पत्रकार अशाेक साेनवणे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नाशिक विभागीय परिषदेचे सचिव मन्सूर शेख, महापालिका स्थायी समितीचे सभापती मनाेज काेतकर, पाेलिस अधीक्षक पाटील यांचे चिरंजीव ऋषभ पाटील, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमाेल येवले, संग्राम काेतकर, केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, एच. एम. मन्यार, विठ्ठल काेतकर, अवधूत कलेक्शनचे अजित पवार, सावली संस्थेचे नितेश बनसाेडे, जाहिरात संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल मुथा भैय्या बाॅक्सर आदी मान्यवर उपस्थित हाेते. पाटील म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विराेधात लढ दिला. पत्रकारांचा तेंव्हाचा हा लढा आता समाजातील चुकीच्या गाेष्टीबाबत सुरू आहे. पाेलिस आणि पत्रकार हे दाेघे समदुखी . आपले जीवन सारखेच असून आपल्याला दरराेज वेगवेगळ्या परीक्षांना सामाेरे जावे लागते. एवढे काम करुनही समाजाकडून म्हणावे तसे काैतुक हाेत नाही. असे असले तरी आपल्या कामातून समाज उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन पाटील यांनी केले. सावली सारख्या संस्थांचे काम काैतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पाटील यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. महापालिका स्थायी समितीचे सभापती मनाेज काेतकर यांनी सावली संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सावली संस्था व पत्रकारांच्या अडीअडचणी साेडवण्यासाठी कायम कटीबध्द असल्याचे सांगितले. कायक्रमाला केडगाव प्रेस असाेसिएशनचे सव सदस्य व त्यांचे कुटूंबिय उपस्थित हाेते. 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबा ढाकणे व सचिवपदी केदार भोपे यांची तर अहमदनगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश गुंड यांच्या यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी विठ्ठल महाराज कोतकर भैय्या बॉक्सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कायक्रमाचे सूत्रसंचालन अमाेल बागुल यांनी केले, तर नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष याेगेश गुंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments