Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाळ ज बोठे याच्या विनाविलंब अटकेसाठी नगरच्या पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत ; गृहमंत्र्यांकडे अॅड सुरेश लगड यांची मागणीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पन्न झाल्यापासून फरार आहे. रेखा जरे हत्याकांडातील इतर पाच आरोपी पोलिस दलाने तात्काळ जेरबंद केले, माञ गुन्हा घडून जवळपास दोन महिने होत आले, तरी हा सहावा फरार आरोपी आपल्या अधिपत्याखालील अहमदनगर येथील कार्यक्षम अशा पोलिस दलाला सापडत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे बोठे याच्या विनाविलंब अटकेसाठी पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी अॅड सुरेश लगड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 
आपल्या आधिपत्याखालील अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अनेक सराईत व फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र डॉक्टर व वकिलांची डिग्री संपादन करणारा मास्टर माईंड आपणास शोध घेऊन सापडत नाही. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. आज या प्रकरणाकडे नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. हा फरार आरोपी आपल्या आधिपत्याखालील अहमदनगर येथील कार्यक्षम अशा पोलिस दलाला सापडू शकत नाही. याचे विशेष वाटते अनेक कालावधीपासून फरार असलेले आरोपी डॉ. निलेश शेळके व रमेश विश्वजीत कासार हे पोलिस दलाला सापडू शकतात, मग हा कायद्याचा उच्चविभुषीत पदवीधर आरोपी का सापडू शकत नाही. अहमदनगरला मनोज पाटील हे कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून आल्याने आम्हा नगरकरांना खूप आनंद झाला. आपल्या आधिपत्याखालील अहमदनगर येथील पोलिस दलात अनेक गुन्ह्यातील आरोपी सापडतील अशी आमची अपेक्षा आहे. आता आमची एकच विनंती आहे की, आपण त्या गुन्ह्याचा तपासाचा वेग वाढविण्याबाबत व कुठल्याही परिस्थितीत या आरोपींच्या मुसक्या आवळण्याबाबत कसोशीने प्रयत्न करण्यास पोलीस अधीक्षक अहमदनगर व तपासी अधिकारी पोलिस उपधीक्षक अजित पाटील यांना आदेशित करावेत, अन्यथा समाजात आपल्या अधिपत्याखाली कार्यक्षम अशा पोलिस दलाबद्दल चुकीचे संदेश जाईल. या फरार आरोपी अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने केसा फेटाळला जाईल यासाठी स्वतः तपासी अधिकारी यांनी जातीने हजर राहून प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात यावेत.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यास विनाविलंब अटक करणेकामी कसोशीने प्रयत्न करण्याबाबत अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील व तपासी अधिकारी पोलिस उपधीक्षक अजित पाटील यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे. यासंदर्भात अॅड लगड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहेत. 

Post a Comment

0 Comments