Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुम्ही छान मित्र जमवा आणि आरोग्याचे फायदे मिळवा

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मित्र आणि मैत्रीला महत्त्व दिल्यास आरोग्याचे आणि फायदे मिळतात. 'फ्रंटियर्स ऑफ सायकॉलॉजी' या नियतकालिकातील एका लेखात याबाबत माहिती देण्यात आली आहे. मैत्रीच्या फायद्यांची चर्चा कायम ऐकावयास मिळते. मित्रांमुळे आपल्याला भावनिक आधार मिळतो, तसेच ते व्यवहारी सल्ले देत असल्याचा उपयोग होतो. मिशिगन विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक आणि मैत्रीबाबतचे संशोधक विल्यम चोपविक यांनी यासंदर्भात हा लेख लिहून माहिती दिली आहे. मित्र असलेल्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षितांना भरपूर मित्र असणे फार उपयुक्त असल्याचे प्रा. चोपविक यांना आढळले. मैत्रीसाठी काही खर्च करावा लागत नाही, उलट आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनाचा बोनस मिळतो. आपले मित्र कुठे राहतात त्यापेक्षा आपल्याला किती जवळचे आहेत. यावर आनंदाचे प्रमाण ठरते असे ते म्हणाले.
या अभ्यासासाठी प्रा.चोपविक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 99 देशातील 3 लाख 23 हजार 200 सहभागी यांची पाहणी केली. मित्रांची संख्या, आनंद मिळवण्याची प्रवृत्ती आणि आर्थिक स्थिती याची माहिती सुद्धा घेण्यात आली. महिला उच्चशिक्षित व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांमध्ये मैत्रीचे मोल अधिक असल्याचे संशोधकांना दिसून आले.


सोशल मीडिया ची सवय 
वाटते तितकी वाईट नाही...
तुमचा मुलगा नेहमी फेसबुक, स्नॅप चॅट, इन्स्टाग्राम अथवा व्हाॅट्स अॅपवर सतत व्यस्त असतो का ?, त्याला त्या शिवाय चैनच पडत नाही का ? असे असेल तर काही काळजी करू नका. कारण लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सायकिट्रिस्टच्या शास्त्रज्ञांनी इंग्लंडमधील 74 हजार मुलांचे अध्ययन करून ही सवय म्हणावी तशी वाईट नाही असा निष्कर्ष काढला आहे. या शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, फेसबुक, व्हाट्सअप किंवा इंस्टाग्राम यासारख्या साइट्स मुलांचा एकटेपणा आणि डिप्रेशन निर्माण होऊ देत नाही, पण या सवयीमुळे मुले आपली छबी रंगरूप, राहणीमान याबाबत खूप काळजी घेतात. पण आई-वडिलांनी त्यांच्याशी वेळोवेळी योग्य प्रकारे संवाद साधला तर त्यांच्या मनात ही भावना निर्माण होण्याची शक्यता कमी होते. असेही निष्पन्न झाले आहे की, सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावरील ताण, बेचैनी व आक्रमकता कमी होते. कारण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्राच्या सतत संपर्कात राहण्याची संधी मिळते. दोडका का खावा ?
🤩दोडका नियमीत खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. 
🤩शरीरात साचलेल्या चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत होते.
🤩प्रतिकारशक्ती वाढते.
🤩ही भाजी अॅसिडिटीवर उत्तम उपाय आहे. वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर त्यांनी ही भाजी खावी फायदा होतो.
🤩 या भाजीने दृष्टी सुधारते.
🤩केस गळण्याचा समस्यावर उपयुक्त.
🤩दातांचे आरोग्य सुधारते.
🤩यात क जीवनसत्व, झिंक, लोह, मॅग्नेशिअम, मॅंग्नीज असतं.
🤩रक्त शुद्धीकरणाचं काम करतं.
पोटाचे कार्य सुरळीत करत.
🤩 फायबरयुक्त असल्याने बुद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
🤩कावीळ झालेल्या व्यक्तींना याचा ज्यूस प्यायला दिल्यावर कावीळ बरी होते.


🧡हृदयाच्या धामण या मोकळ्या राहण्यासाठी...
हृदयाच्या आजारासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे. धमन्यांमध्ये जमलेल्या फॅट्स आहाराच्या माध्यमातून अतिरिक्त फॅट्स म्हणजेच कोलेस्ट्रॉल, फॅटस, सेल्यूलर वेस्ट, फाईब्रिन आणि कॅल्शियम धमन्यांमध्ये जमा होते. काही असे खाद्यपदार्थ आणि मसाले आहेत. जे धामन्यांमध्ये जमा झालेल्या फॅटसला काढण्यासाठी सहायक ठरतात.
👉लसूण - हृदयाच्या धमन्यांना स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे लसणाचा रोजच्या आहारात समावेश करावा. जर्मनीत झालेल्या एका संशोधनानुसार लसणांचे नियमित सेवन करण्याने हृदयाची महत्त्वाची धमनी असलेली अॅओर्टा कडक होत नाही. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
👉डाळिंब - जर्नल्स प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये 2005 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनानुसार, डाळिंबाचे नियमित सेवन करण्याने धमन्या चोक होणे थांबते. या फळात खूप अधिक प्रमाणात पाॅलिफेनाॅल्स, क जीवनसत्त्व आणि इतर अनेक अँटिआॅक्सिडंट्स असतात. या फळाचा रस नायट्रिक अॅसिडच्या उत्पादनात मदत करतो.
👉हळद - हळद असा सुपरफुड मसाला आहे. ज्यास भारतीय भोजनात आवश्यक मानले जाते. यामध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते. याचा सगळ्यात मोठा फायदा धमन्या आणि रक्तनलिकांची सूज कमी होण्यात बघायला मिळतो.
👉 जवसाचे तेल - ज्या खाद्यपदार्थांमध्ये अल्फा लिनोलेनिक अॅसिड म्हणजे फ्लॅक्सीड ऑइल असते. त्याच्या माध्यमातून हृदयाच्या आजारांना रोखता येते. एका अध्यायनुसार, जवसाच्या तेलाचं सेवन करण्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.Post a Comment

0 Comments