Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करणारा अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (वय 40 रा. लिपणगाव ता. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (रा. लिपणगाव ता. श्रीगोंदा), निंभोरे मेजर (रा. घोटवी ता. श्रीगोंदा) यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी येथील शेती गट नंबर 674 मधील 22 एकर जमिनी जमिनीचे मूळ मालक मयत झालेले आहे. ही माहिती असतानाही सदर जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करून सदरची जमीन ही एकनाथ बाळासाहेब बांदल (रा. करडे ता. शिरूर जि. पुणे) व त्यांच्या साथीदारांना विक्री केली. या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कर्जत पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम कुरुमकर यांच्याविरुद्ध फिर्यादी दाखल झाली होती. या फिर्यादीवरून 420 465 467 468 471 472 120(ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपी अहमदनगर परिसरातील येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीआधारे श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून लालटाकी येथे पुरुषोत्तम कुरूमकर याला पकडण्यात आले. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो.नि. चंद्रशेखर यादव, सपोनि सुरेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे, सफौ.नानेकर, पोहेकाॅ संदीप घोडके, विष्णू घोडीचोर, पोना शंकर चौधरी, दिनेश मोरे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाॅ योगेश सातपुते, अर्जुन बडे, कर्जत चेक पोस्टचे पोकाॅ शाम जाधव, गोवर्धन कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments