Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा अटक ; कोतवाली पोलिसांची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर/ व्हिडिओ 
अहमदनगर - बळजबरीने गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याची कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी तातडीने दखल घेत, गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. पथकाने सापळा लावून मंगळसूत्र सराईत चोरट्यास पकडले. रुपेश प्रकाश यादव (वय 37 रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार आनंदऋषी हॉस्पिटल व एस पॅलेस हॉटेल परिसरात कोतवाली गुन्हे शोध पथकाने सापळा लावला संशयित मोपेड गाडीवरील इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी याने स्वतःचे नाव सांगितले असता, यानंतरही अधिक चौकशी त्याचाकेली परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच, त्याने दाखल गुन्हा व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत मोपेड गाडीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. तसेच यावेळी तपासात त्याच्याकडे गुन्ह्यात वापरण्यात आलेली अॅटीव्हा 5 जी गाडी त्याने उस्मानाबाद (जि. औरंगाबाद) येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि हेमंत भोंगळे, गुन्हे शोध पथकाचे योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रवींद्र टाकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी, कैलास शिरसाठ, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, सुजय हिवाळे, बापूसाहेब म्हस्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments