Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर नगर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या पथकाची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील तोफखाना हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या पथकाने चार ठिकाणी कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याबाबत समजलेली माहिती अशी की, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना विक्री करणा-याबाबत नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार श्री ढुमे यांच्या पथकाने शोध घेऊन तोफखाना हद्दीत प्रोफेसर चौक येथे अजय बाबासाहेब राऊत यांच्या पतंग सेंटर प्रेमदान चौक येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेऊन 15 हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या 50 हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजा चक्री, मांजा गुंडाळणाऱ्या तीन लाकडी मशीन आणि 26 हजार 580 रुपये विक्रीतून मिळालेले रक्कम हस्तगत केली.
दरम्यान चार ठिकाणी मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली पोना फसले, खंडागळे, ओव्हाळ, साळवे, सागर द्वारके, सलीम शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नायलाॅन मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाच्या विक्री व वापरास शासनाने प्रतिबंध केला आहे. कोणी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री व वापर करणार नाही कोणीही सदर नायलॉन मांजा विक्री वापर करताना मिळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विचार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments