Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात घनकचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छतेचा ठेका मिळण्याची याचिका फेटाळली

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव- शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छते बाबत दिलेला ठेका पुन्हा मिळण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.व्ही.गंगापुरवाला व न्यायमुर्ती एस.डी.कुलकर्णी यांनी फेटाळल्याची माहिती शेवगाव नगरपरिषदेचे वकिल अँड.निलकंठ व्दारकानाथ बटुळे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, शेवगाव नगरपरिषदेने जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील पेंडकाई माता बहुउद्देशीय संस्थाला शेवगाव शहरातील कचरा वाहतूक करणे,जमा झालेल्या कचऱ्यापासून कंपोस्टींग करणे,औषधे फवारणी करणे तसेच इतर स्वच्छतेची कामे करण्यासाठी एक वर्षासाठी(सन ७-१-२०१९ ते सन ६-१-२०२० पर्यंत) लिखित कराराने ठेका दिला होता त्या कराराच्या वेळी संस्थेचे काम समाधानकारक झाल्यास पुढील दोन वर्षे मुदतवाढ देण्याचे ठरले होते मात्र सदर संस्थेचे काम समाधानकारक नसल्याने सदर संस्थेचा ठेका रद्द करून नव्याने जाहिरात देऊन दुसऱ्या एजन्सीला एक वर्षासाठी मंजूर करण्यात आल्याने शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात पेंडकाई माता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजेंद्र नारायण बोरसे यांनी पुन्हा दोन वर्षे मुदत वाढुन ठेका मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती सदर याचिका मा.न्यायमुर्ती एस.व्ही.गंगापुरवाला व एस.डी.कुलकर्णी यांनी फेटाळली. शेवगाव नगरपरिषदेच्या वतीने अँड.निलकंठ व्दारकानाथ बटुळे यांनी पेंडकाई माता संस्थेच्या वतीने अँड.किरण नगरकर तर सरकार तर्फे के.एन.लोखंडे यांनी काम पाहिले आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments