Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या १,११,१११व्या साखर पोत्याचे पूजन


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - अत्यंत आर्थिक अडचण असूनही त्यावर संचालक मंडळाने अभ्यासू वृत्तीने मात करून केदारेश्वरचा चालू हंगाम यशस्वीपणे सुरू आहे ही बाब अभिमानस्पद आहे. कारखान्याने स्वनिधी उपलब्ध केल्यास अडचणीच्या काळात फायदा होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी प्रशासक व लोकमंगल समूहाचे संचालक, अविनाश महागावकर यांनी व्यक्त केले .
श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,११,१११व्या साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी प्रशासक लोकमंगल समूहाचे संचालक, अविनाश महागावकर,सीडी फकीर राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी अभियंता यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे,अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, जिप सदस्या प्रभावती ढाकणे, बुलढाणा बँकेचे अभिनाथ शिंदे चेअरमन व्यंकटेश मल्टिस्टेट, सुभाष जमधडे व्यवस्थापक राजाराम बापू ऍग्रो, बाळकृष्ण गीते डेप्युटी टेक्निकल नॅशनल फेडरेशन,मयूर बंब चार्टड अकौंट, बंटी जगताप माजी संचालक साईकृपा शुगर, सचिन अडागळे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना संस्थापक बबनराव ढाकणे म्हणाले की चालू हंगामात अतिरिक्त ऊसाचे गाळप करणे मोठे आव्हान आहे आर्थिक अडचण असूनही मोठ्या जिद्दीने संचालक मंडळाने एकत्रितपणे हंगाम यशस्वीपणे हाती घेतला आहे,पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले असून पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे अधिकारी चांगले विचाराचे असतील तर सत्ता कोणाची असली तरी काम चांगले होते, भांडवलाशिवाय कोणताच उदयोग उभा राहत नाही, साखर व्यवसायात विश्वास अत्यंत महत्वाचा आहे, संचालक मंडळाने तो निर्माण केल्याने चालू गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू असल्याचे म्हणाले ऊस उत्पादकांना लवकरच पेमेंट खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अश्विनीकुमार घोळवे यांनी प्रास्ताविक करून सविस्तरपणे माहिती दिली 
यावेळी कार्यक्रमास युवा नेते राजेंद्र दौंड, उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, संचालक सुरेशचंद्र होळकर, भाऊसाहेब मुंडे, विठ्ठलराव अभंग, बाळासाहेब सिरसाट, सतिश गव्हाणे, सुभाष खंडागळे, विठ्ठल दसपुते, शेषेराव बटुळे, 
श्रीकिसन पालवे, संदीप बोडखे, मोहनराव दहिफळे, प्रभाकर हुंडेकरी, सिताराम बोरुडे, सिद्देश ढाकणे, नंदकिशोर मुंढे, ऍड संजय सानप, वैभव दहिफळे, प्रभारी कार्यकारी संचालक, रमेश गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळोशे, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, पोपटराव केदार, शेतकी अधिकारी जाधव, अभिमान विखे, 
यांच्यासह सभासद शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट यांनी मानले. 

संकलन - बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments