Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतीसाठी 71. 46 टक्के मतदान ; सर्वाधिक संगमनेर तालुक्यात 90 ग्रामपंचायतीत मतदान

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यात 705 ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (दि.15) मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यात 71.46 टक्के मतदान झाले असून मतपेटीत नव्याने होणाऱ्या सदस्यांचे भाग्य बंद झाले आहे. हे भाग्य सोमवारी (दि.18) जानेवारीला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समोर येणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत 1008295 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. 
2019 ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक झाल्या. यात अकोले 36, संगमनेर 90, कोपरगाव 29, श्रीरामपूर 26, राहता 19, राहुरी 44, नेवासा 52, नगर 56, पाथर्डी 75, शेवगाव 48, कर्जत 54, जामखेड 39, श्रीगोंदा 58 अशा एकूण 705 ग्रामपंचायतीसाठी ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 90 ग्रामपंचायतीसाठी 72.82 टक्के मतदान झाले.Post a Comment

0 Comments