Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावेडी नाट्य संकुलासाठी 5 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर : आमदार जगताप

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : सावेडी नाट्य संकुलासाठी 5 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे दिली आहे.
सावेडी नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. 2011 साली शासनाच्या वतीने सावेडी नाट्यगृहासाठी 2 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर झाले होते. पण त्यानंतर सावेडी नाट्यगृहाच्या कामाची व्याप्ती व आसन क्षमता पाहता, सावेडी नाट्यगृहासाठी अंदाजे 11 कोटीच्या आसपास खर्च येणार होता. त्या अनुषंगाने सावेडी नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उर्वरित निधीबाबत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय व विभागीय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावेडी नाट्यगृहासाठी जिल्हा नियोजन मंडळाला 5 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सावेडी नाट्यगृहाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 5 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच सावेडीत नगरकरांसाठी उपलब्ध होईल, असे पञकात श्री जगताप यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments