Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

3 गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील होत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, त्यादृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत मिळालेल्या माहितीनुसार 3 गावठी कट्टे बाळगणारा सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडला. पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल (वय 24 रा. गुंजाळे ता. राहुरी जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गुंजाळे या गावात पप्पू चेंडवाल हा देशी बनावटीचे गावठी कट्टा बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीनुसार श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गुंजाळे गावात जाऊन खंडोबा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून पप्पू चेंडवाल याला पकडले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ 3 देशी बनावटीचे गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे असे एकूण 91 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
पप्पू चेंडवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी राहुरी पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण (जि. जळगाव), एमआयडीसी, तोफखाना, वीरगाव (ता वैजापुर जि. औरंगाबाद), शेवगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, राजेंद्र सानप, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाॅ रोहित येमूल, मच्छिंद्र, बर्डे, विजय धनेधर, मयूर गायकवाड, रवींद्र घुंगासे, मपोकॉ ज्योती शिंदे व चापोहेकाँ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments