Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत निवडणूक : वार्ड नं. 3 मध्ये तिरंगी तर वार्ड नं. 1 व 2 मध्ये दुरंगी लढत होणार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून पाहिले जाणाऱ्या चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. याठिकाणी एकूण 3 वार्डासाठी ही निवडणूक होत असून निवडणुकी नंतर होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर सर्व पॅनलने आपली व्यूहरचना आखली आहे. यात येणाऱ्या काळात ते दिसेलच!, तत्पूर्वी सुरू झालेल्या निवडणुकीत आपला उमेदवार सरपंचपदासाठी असावा, यासाठी सर्वच पॅनलने आटापिटा सुरू केला आहे. या 3 नंबर वार्ड मध्ये स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनल, आणि ग्राम परिवर्तन पॅनल,तसेच अंगठेशाई परिवर्तन या तिन्ही पॅनलने उमेदवार उभे केलेले असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. वार्ड नं. 2 मध्ये स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनल आणि मळाईदेवी परिवर्तन पॅनल अश्या दोन्ही पॅनलने उमेदवार दिल्याने या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. वाॅर्ड नं. 1 मध्ये फक्त स्व. गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनल व ग्राम परिवर्तन पॅनल या दोन पॅनलनेच उमेदवार दिले असून अन्य एका पॅनेलला उमेदवार देता आले नाहीत.
चिंचपूर पांगुळ येथील निवडणुकीत वाॅर्ड नं. 3 मधील उमेदवारांवर तिन्ही पॅनलने चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. या 3 नंबरच्या वार्डामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पॅनल मतदारांच्या अंधारात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यामुळे 3 नंबर वार्डाच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.
वार्ड नंबर 3 मध्ये स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे प्रगती धनंजय बडे, आजिनाथ सिताराम बडे, सखुबाई गहिनाथ बडे तर ग्राम परिवर्तन पॅनलचे प्रतिभा गोविंद बडे, उद्धव भगवान केदार, भामाबाई ज्ञानदेव बडे आणि अंगठे शाही परिवर्तन पॅनलचे स्वाती सुभाष बडे, रघुनाथ काशिनाथ बडे, शोभा गहीनाथ बडे असे तिन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये लढत होत असल्याने याठिकाणी तिरंगी लढत होत आहे.

वार्ड नं. 2 मध्ये स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे ज्ञानदेव महादेव मेरड, शिलाबाई धोंडीबा धायतडक, कुसुम नारायण बारगजे आणि मळाईदेवी परिवर्तन पॅनल मानेवाडीचे सोमनाथ पोपट पोफळे, शोभा नारायण बडे, सीमा शिवाजी बडे आदि दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये लढत होत असल्याने या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे.
वार्ड नंबर 1 मध्ये अन्य पॅनलला उमेदवार न मिळाल्याने या ठिकाणी स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे
विक्रम मारुती साखरे, विष्णु शंकर खाडे, कडूबाई रावसाहेब बडे हे तिन उमेदवार आहेत.तर ग्राम परिवर्तन चे पुरुषोत्तम नामदेव रंधवे ,गोदावरी पोपट बडे, अमोल नवनाथ बडे हे उमेदवार म्हणून निवडणुकीस सामोरे जात आहेत त्यामुळे वाॅर्ड नं.1,2, 3, मधील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली,तिन्ही पॅनलचे उमेदवार मंतदाराच्या भेटीस गेल्यानंतर आमचे मत आपल्याच पॅनलला असे सांगून बोळवण केली जात आहे.येत्या 15 तारखेस मतदान होणार असून मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे.
संकलन-
पत्रकार सोमराज बडे
 मोबा-93722957

Post a Comment

0 Comments