Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीतील अवैध धंदे बंद होणेसाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमावे : या मागणीसाठी जितेश लोकचंदानी यांचे 26 जानेवारीपासून पोलीस स्टेशनसमोर उपोषण ; तीन दिवसानंतर मुंबईत करणार उपोषण


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी -शिर्डी येथे दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत असून अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीची त्यामुळे बदनामी होत आहे, तरी शिर्डी येथील अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी येथे स्वतंत्र पथक त्यासाठी निर्माण करून शिर्डी व परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी दै. साईदर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी 26 जानेवारी पासून शिर्डी पोलीस स्टेशनसमोर तीन दिवस उपोषण करणार असल्याचा व या तीन दिवसात ही मागणी पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी दिला आहे.


त्यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व ग्रहमंत्री ना, अनिल देशमुख तसेच सर्व मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे देश-विदेशातून साईभक्त दर्शनाला येत असतात, त्यामुळे येथे गेल्या काही वर्षापासून दारू विक्रीचे परवाने दिले जात नाही ,मात्र तरीही येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री होत आहे ,त्याचप्रमाणे येथे दारू बरोबरच मटका, जुगार, गांजा विक्री त्याचप्रमाणे अवैध वेश्या व्यवसाय असे अनेक अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. शिर्डीला पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे हे नव्याने बदलून आले. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याही फोल ठरले आहेत ,येथे सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. मी अवैध धंदे बंद होण्यासाठी व पाकीटमारी बंद व्हावी यासाठी गेल्या बारा वर्षापासून येथे विविध निवेदन देऊन उपोषणे केली आहेत. त्या विरोधात लढत आहे, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या बंगल्यासमोर एक शिवसेनेमध्ये मी पूर्वी काही वर्ष असल्यामुळे त्यांनाही विनंती अर्ज केला होता. नंतर त्यांच्या बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तदनंतर मुख्यमंत्र्याचे सचिव यांनी कोरोणामुळे आपण उपोषण करू नये. आपली मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन मुबईत दिले होते, त्यामुळे उपोषण स्थगित केल्यानंतर कोरोणा काळात मी उपोषणाचा मार्ग स्थगित ठेवला होता, मात्र तरीही या काळात तसेच अद्यापही शिर्डी येथे अवैध धंदे मोठ्या तेजित सुरु आहे, येथे पोलीस उप अधीक्षक व पोलीस निरीक्षक नव्याने बदलून आले तरीही येथे अवैध धंदे सुरूच आहेत. यावर आळा बसावा यासाठी शिर्डी येथे कर्तव्यदक्ष अशा पोलिसांचे एक स्वतंत्र पथक निर्माण करावे व येथील अवैध धंदे त्वरित बंद होण्याचा प्रयत्न करावा जर हि माझी मागणी मान्य झाली नाही तर मी मी शिर्डी पोलीस स्टेशन समोर 26जानेवारी 20 21 पासून उपोषण करणार आहे, तीन दिवस येथे उपोषण करणार असून जर या काळातही माझी मागणी पूर्ण झाली नाही. शिर्डी व परिसरातील अवैध धंदे बंद होण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले गेले नाही तर मी चौथ्या दिवसापासून मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय बंगल्यासमोर अामरण उपोषण करणार असल्याचा इशारा जितेश मनोहरलाल लोकचंदानी शिर्डी यांनी या निवेदनातून दिला आहे.


Post a Comment

0 Comments