Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑपरेशन मुस्कान मध्ये हरवलेल्या 1011 व्यक्तींचा शोध ; दि.26 जानेवारीपर्यत शोध मोहिम- एसपी मनोज पाटील

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर/ व्हिडिओ 
अहमदनगर- ऑपरेशन मुस्तान दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एकूण 2301 मोठ्या व्यक्ती हरवलेला ठरवलेल्या होत्या. त्यापैकी 1011 व्यक्तींचा शोध घेतला आहे. 1210 महिलांपैकी 621 व 1091 पुरुषांपैकी 390 चा शोध घेण्यात आला आहे. दि. 1 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 1088 बालके, महिला व पुरुष यांचा शोध घेण्यात आलेला आहे. ही मोहीम दि.26 जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दि. 11 ते 31 डिसेंबर 2020 यादरम्यान ऑपरेशन मुस्कान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याबाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचा आदेश झाले होते. त्या अनुषंगाने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरवलेला महिला-पुरुष तसेच अपनयन व अपहरण केलेली बालके यांचे शोध कमी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तोफखाना पो.नि, श्रीगोंदा पो.नि., संगमनेर, कर्जत डिवायएसपी यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. तसेच जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी, कर्मचारी यांनीही चांगले काम केले आहे. नगर शहर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शोध घेता, रेकॉर्ड बाहेरील 47 मुले मिळून आली. त्यांना त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात त्यांना देण्यात आली. या कारवाईत 228 आरोपींना अटक करण्यात आले असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, ऑपरेशन मुस्कानमध्ये विशेष कामगिरी केलेल्या पथकाचा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपञक देऊन गौरव करण्यात आला.
ही महत्त्वपूर्ण कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे मॅडम, पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ सोमनाथ कांबळे, मपोहेकॉ अर्चना काळे, मपोना रीना मस्के, मोनाली घुटे, छाया रांधवन, रूपाली लोहारे आदिंनी केली आहे. Post a Comment

0 Comments