नगर रिपोर्टर
पाथर्डी- श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान,पाथर्डी या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन श्रीमद्भगवद्गीता पाठांतर स्पर्धा गीताजयंतीच्या निमित्ताने घेण्यात आली.या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील नगर,पुणे,मुंबई,ठाणे,धुळे यांसह सुमारे १८ शहरातील गीता साधकांनी भाग घेतला. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ५ वर्षाच्या बालकापासून ते ७५ वर्षाच्या सर्व वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला .
श्रीमद्भगवद्गीता स्पर्धांचे परीक्षक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत श्रीमद्भगवद्गीता अभ्यासक व तज्ञ पू.श्रीपादजी केळकर,डोंबिवली, पू.गोविंदजी महाराज जाटदेवळेकर, पू.दीपकशास्त्री श्रोत्रिय,पुणे, काम पाहिले.
स्पर्धेतील महाविजेते सुधीरजी लिमये,ठाणे(१६वाअ.) , कु.प्रांजली कुलकर्णी,नगर(१७वा अ.), सौ.अनिता डबीर,पुणे(१२ वा अ.) उत्तेजनार्थ पारितोषिके कु.मिहीका बोधले,सांगली(१५वा अ.), चि मिहीर पित्रे,ठाणे(१६ वा अ.), कु.भार्गवीदेशपांडे,संभाजीनगर (१२ वा अ.) यांना मिळाली. लाइक्स विजेते सौ.वर्षा संजय वैद्य,परांडा(१२वाअ.), कु.प्रतिभा गोरक्षनाथ शेळके,शेवगांव(१५वा अ.), व्ह्युवज् विजेते कु.प्रतिभा गोरक्षनाथ शेळके,शेवगांव २५२३, सौ.वर्षा संजय वैद्य,परांडा १७५०, वॉच टाइम विजेते सौ.साधना अनिल शाह २३५२ मि. याप्रमाणे इतर विजेते आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
तर बक्षीस वितरणाचा जाहीर कार्यक्रम पाथर्डीत जानेवारीत होणार असला तरी सर्व अनुपस्थित विजेत्यांनाही बक्षीसे घरपोच देण्यात येतील.या स्पर्धेचे ऑनलाइन प्रक्षेपण संपूर्ण भारतासह परदेशातही पाहण्यात आले. सुमारे ३०००० लोकांनी हा उपक्रम पाहिला, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक व श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख यांनी दिली.अशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आली व यशस्वी रितीने पार पाडण्यात आल्याने संयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दर्शन मुळे,प्रथित देशपांडे व रेवा देशमुख यांनी परिश्रम घेतले.
0 Comments