Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हद्दपारीचे उल्लंघन करून चाकू घेऊन फिरणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांकडून जेरबंद

  


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- हद्दपारीच्या कारवाईत असणारा आरोपी कायद्याचे उल्लंघन करून नगर शहरातील सारसनगर भागात खुलेआम धारदार चाकू घेऊन फिरणारा पोना राजेंद्र सुद्रीक यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असताना हद्दपारीचे उल्लंघन करून धारदार चाकू स्वतःजवळ बाळगून त्रिमूर्ती चौक, सारसनगर भागात फिरत असणारा बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव (वय 25 रा. मकासरे चाळ कोठी स्टेशनरोड, अहमदनगर) याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोना राजेंद्र सुद्रीक यांनी सत्तूर सारख्या हत्यारासह आरोपी जाधव याला अटक केली आहे. 
पोना सुद्रीक यांच्या फिर्यादीवरून आरोपी जाधव याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं 2847/2020 भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम च 4/25, मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, पोसइ शिंदे यांच्या सूचनेनुसार अधिक तपास पोहेकाॅ जी बी नागरगोजे हे करीत आहे.
Post a Comment

0 Comments