Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी


ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध म्हणजेच लोकशाहीचा खून ; पैशांचे प्रलोभन दाखवून निवडणुका बिनविरोध करणे, हे घटनाबाह्य असून धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांच्या फायद्याचे आहे.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


नगर जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झालेली असताना ठिकठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. या विषयावर स्थानिक आमदार ग्रामपंचायतींना 10 लाख ते 25 लाखाचे आमिष दाखवून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जाहीर आव्हान त्यांनी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा केले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग तर आहेस तसेच लोकशाहीचा खून आहे. पैशांचे प्रलोभन दाखवून निवडणुका बिनविरोध करणे, हे घटनाबाह्य असून धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांच्या फायद्याचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक की मोठ्या संघर्षाची असते. गावागावात मतभेद आणि गावाच्या खुंटलेला विकास हे स्थानिक आमदारांना माहिती असून देखील ते समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण वंचित समुहा पैशाचे राजकारण करू शकत नाही, हे माहिती असल्यामुळे काही आमदार पैशाच्या व सत्तेच्या जोरावर वंचितांची मुस्कटदाबी करत आहेत. ज्यांना ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असेल तर पन्नास हजार रुपये व सरपंच व्हायचे असेल तर त्यांनी एक लाख रुपये निधी गावासाठी द्यायचा आहे. त्यासाठी चुकांची नावे घेऊन सोडत काढली जाईल अशा प्रकारच्या घटना ऑफर आमदारांकडून दिल्या जातात. त्यामुळे वंचित दुर्लक्षित घटकांना आपला उमेदवार सदस्य आणि आपल्या मतदानातून निवडून येण्याची संधी सर्वसामान्य मतदारांना मिळणार नाही. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध झाल्या तर सदस्य निवडीचा अधिकार मतदारांना राहणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य वंचित दुर्लक्षित भटक्या समाजाच्या मतदारांना विश्वासात घेऊन ग्रामसभेत ठराव करीत राज्यघटनेप्रमाणे निवडणुका होऊ द्याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे केली आहे. 'ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करावा व लाख रुपये मिळवा' अशा प्रकारच्या आश्वासने, आव्हाने करणारे लोकप्रतिनिधी आचारसंहितेचा भंग करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. उद्या कदाचित बिनविरोध निवडणुका सत्ता असेल लोकप्रतिनिधी राज्य सरकारच्या मध्ये जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कुठून कसा देणार? कर स्वरूपात येणारा पैसा पुढार्‍यांच्या घरात नसून कर स्वरुपात सर्वसामान्य जनतेकडून मिळालेला निधी आहे. या पैशाचा गैरवापर करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार या आमदारांना नाही. ज्या लोकप्रतिनिधींनी निवडणुका प्रभावित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले आहे. त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा. निवडणूक आयोगाने सदर वक्तव्य करणाऱ्या आमदाराचे पद रद्द करून टाकावे, असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सुप्रीम कोर्ट व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे असे वक्तव्य करणाऱ्या आमदारां विरुध्दात लोकहीत याचिका दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वक्तव्याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर या आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे बारसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



Post a Comment

0 Comments